जळगाव : शेतमालकाने कामावरुन काढल्याच्या रागातून कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला या दोघा भावांनी एका विस वर्षाच्या विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मध्यरात्री घडली.
पत्नीवर बलात्कार करताना पतीने एका आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला हाताला झटका देत त्याने पलायन केले. पहाटे एमआयडीसी पोलीस स्टेशनला सदर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सदर गुन्हा आता जळगाव तालुका पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आल्याचे वृत्त आहे.
पीडित महिला व तिचा पती एका शेतात वास्तव्य करतात. संशयित कलशा व बलशा हे दोन्ही भाऊ जवळच असलेल्या दुस-या एका शेतात वास्तव्याला आहेत. कलशा याला दारु पिण्याची सवय आहे. त्यामुळे त्याला शेत मालकाने कामावरुन काढून टाकले.
तो राग मनात धरुन बलशा व कलशा हे दोघे भाऊ मध्यरात्री पीडित महिलेच्या घरात गेले. कलशा याला कामावरुन का काढून टाकले असा जाब बलशाने पीडित विवाहितेच्या पतीला विचारला. तसेच त्याला मारहाण देखील सुरु केली. या प्रकारामुळे घाबरलेला पीडितेचा पती ओळखीच्या शांताराम बारेला यांना बोलावण्यास गेला. दरम्यान कलशा व बलशा या दोघांनी पीडितेवर बलात्कार केला.
दरम्यान नराधम दोघा भावांनी पिडीतेच्या लहान मुलीला देखील बाजुला फेकून दिले. पत्नीवर बलात्कार होत असताना तिचा पती आला असता बलशा पळून गेला. कलशा याला दोघांनी धरुन ठेवले. मात्र त्याने देखील हाताला झटका देत पलायन केले. पोलिस दोघांच्या मागावर आहे.
मध्यरात्री एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल. दरम्यान हा गुन्हा जळगाव तालुका पोलिसात वर्ग केल्याचे वृत्त आहे.