दोघे मोबाईल चोरटे एलसीबीच्या ताब्यात

On: August 15, 2021 6:31 PM

जळगाव : मोबाईल चोरी करणा-या आरोपींच्या शोध मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहुर पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

सलमाना नबी पिंजारी (पहुर ता. जामनेर) व समिर सत्तार पिंजारी (शाहू नगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला गु.र.न.284/21 भा.द.वि. 379, 34 नुसार गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, चालक मुरलीधर बारी यांच्या पथकाने दोघांना अटक करत पुढील तपासकामी पहुर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment