जळगावच्या व्यापा-याने केला मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

On: August 16, 2021 8:27 AM

जळगाव : जळगाव येथील एका व्यापा-याने मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे व्यापा-याचा आत्महत्येचा प्रयत्न असफल ठरल्याचे वृत्त आहे. राजु गजरे (50) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या व्यापा-याचे नाव असल्याचे समजते. मात्र अधिक माहिती समजू शकली नाही.

आपल्या गोदामातील धान्य साठा विना परवानगी परस्पर विक्री करणा-या व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी गजरे यांची मागणी होती. मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या सतर्कतेने आत्महत्येचा प्रयत्न असफल ठरला आहे. स्थानिक पातळीवर आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप राजु गजरे यांनी केला होता.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हातात रॉकेलची बाटली घेऊन आत्महत्या करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पुढील घटना टळली. ताब्यात घेण्यात आलेल्या राजु गजरे यांच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देखील समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment