गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी शरण

On: August 16, 2021 3:33 PM

जळगाव : जळगाव मनपाचे उप महापौर कुलभुषण पाटील यांच्या दिशेने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जुगल संजय बागुल हा पोलिसांना शरण आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

फरार जुगल बागुल हा रामानंद नगर पोलिसांना काल सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शरण येत पोलिस स्टेशनला हजर झाला. त्याला रात्री नऊ वाजता अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

या गुन्ह्यातील किरण शरद राजपूत,उमेश पांडुरंग राजपूत, महेंद्र पांडुरंग राजपूत आणि भूषण बिऱ्हाडे यांना यापुर्वी अटक झालेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिप परदेशी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment