डीआरएम कार्यालयातील लाचखोरीचे भांडे उघडले—- अभियंत्यासह अधिक्षकास एनसीबीने जागीच पकडले

On: August 16, 2021 4:00 PM

जळगाव : भुसावळ येथील डीआरएम कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरण एनसीबीने उघड केले आहे. रेल्वेच्या विभागीय अभियंत्यासह कार्यालय अधिक्षकास लाचेची रक्कम घेतांना एनसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. वर्क ऑर्डर देण्याकामी लाच घेणारे एम.एल. गुप्ता असे विभागीय अभियंत्याचे तर सजीव रडे असे कार्यालय अधिक्षकाचे नाव आहे. अभियंत्याने दोन लाखाची तर कार्यालय अधिक्षकाने चाळीस हजार रुपयांची लाच घेतली होती.

16 ऑगस्टच्या दुपारी घडलेल्या या घटनेने रेल्वे डिआरएम कार्यालयासह भुसावळ शहरातील रेल्वे अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे. या लाचखोरीला उघड करण्यासाठी एनसीबीचे पथक गेल्या एक आठवड्यापासून मुक्कामी होते. भुसावळ येथील डीआरएम कार्यालयात लाचखोरीचे अनेक प्रकार सातत्याने सुरु असतात. मात्र कित्येक प्रकार उघड होत नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment