तलाठी महिलेस केली शरीरसुखाची मागणी?

On: August 17, 2021 11:21 AM

नाशिक : नियमबाह्य करण्यात आलेल्या बदली रद्द करण्यासाठी दाद मागण्यासाठी गेलेल्या महिला तलाठ्याकडे वरिष्ठ अधिका-याने शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघड झाली आहे. संशयीत आरोपीच्या पिंज-यातील वरिष्ठ महसुल अधिका-याने केलेल्या शरीरसुखाची मागणीच्या प्रकाराची व बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी संबधीत महिला तलाठ्याने मॅटमधे धाव घेत बदली रद्द केली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील या घटनेमुळे महसुल विभागात खळबळ माजली आहे. बदली रद्द करण्याकामी तलाठी महिलेकडे करण्यात आलेल्या शरीरसुखाच्या मागणीचा आरोप निराधार असल्याचे सदर अधिका-याने म्हटले आहे. दरम्यान या प्रकारामुळे महसुल विभागात मात्र बरीच खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment