बंद मेडिकल दुकानातून 43 हजारांचा ऐवज लंपास

On: August 17, 2021 5:06 PM

केज : बंद असलेल्या मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून एक मोबाइल आणि 27 हजार 870 रुपये रोख असा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोजा मोहल्ला परिसरातील रहिवासी असलेल्याअ एहतशाम मुस्ताक खतीब या तरुणाचे साखरे हॉस्पिटलजवळ मेडिकल दुकान आहे. रविवारच्या रात्री दुकान बंद करुन घरी गेल्यानंतर चोरट्यांनी डाव साधत दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करत चोरीचा प्रकार केला.

या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल व रोख 27 हजार 870 रुपये असा ऐवज लंपास केला. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरण केज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment