चिखलदऱ्याच्या जत्रा डोहात दोघे बुडाले

On: August 17, 2021 5:25 PM

चिखलदरा : 15 ऑगस्ट रोजी सुटी असल्यामुळे चिखलदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या दोघा तरुणांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना स्वातंत्र्यदिनी घडली. शेख अक्रम शेख कुरेशी (26) आणि शेख अजिम शेख सकुर (27) दोघे रा. अकोट फैल अशी डोहात पडून मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. स्थानिकांच्या मदतीने दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र दोघांचा जिव वाचू शकला नाही. आपल्या सात मित्रांसह मृत्यू पावलेले दोघे मित्र चिखलदरा येथे आले होते.

धोक्याची सुचना देणा-या फलकाकडे दुर्लक्ष करत दोघा मित्रांनी डोहात उतरुन आनंद लुटला. मात्र हा आनंद त्यांच्या जिवावर बेतला. खोल पाण्यात रुतून दोघांचा जिव गेला. या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याची मागणी या घटनेच्या निमित्ताने होत आहे. धोक्याची सुचना लावलेले फलक असून देखील तरुण त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा जिवावर बेतणा-या घडत असतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment