साडेचार लाखात फसवणूक – भोंदूबाबासह साथीदार गजाआड

अहमदनगर : पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवणा-या भोंदूबाबासह त्याच्या साथीदाराला श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाने थेऊर येथून अटक केली आहे. संतोष साहेबराव देवकर व अशोक फकिरा चव्हाण (दोघे, रा जाधववस्ती थेऊर, ता हवेली जि. पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव फाटा येथे पैसे दुपटीचे आमिष दाखवत करमाळा येथील दत्तात्रय शेटे या इसमाची साडेचार लाख रुपयात फसवणूक झाली होती. अटकेतील पुणे येथील भोंदूबाबासह त्याच्या साथीदाराकडून पावणेतीन लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली कार (एमएम 12 बीक्यू 5529) आणि दोन मोबाइल असा एकूण 4 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या पथकातील स.पो.नि. दिलीप तेजनकर, सहायक फौजदार अंकुश ढवळे, पो.ना. गोकुळ इंगवले, पो. कॉ. प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, सायबर सेलचे प्रशांत राठोड यांनी तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here