लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

जळगाव – भारताच्या स्वतंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल तालुक्यातील खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकसहभागातून निर्माण करण्यात आले. खर्ची खु. येथील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता यावी या उद्देशाने ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून “ध्येय अभ्यासिका” सुरू करण्यात आली. गावातच अभ्यास करण्यासाठी व पुस्तकांची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने अभ्यासिकेचे उद्घाटन जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून व फित कापून करण्यात आले. नानाभाऊ महाजन यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजे यातून समाज घडतो परिणामी आपल्या गावाचा विकास होण्यास हातभार लागतो. यासाठी ध्येय अभ्यासिकेचा सदुपयोग करून गावातील विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे आवाहनही नानाभाऊ महाजन यांनी केले. दरम्यान पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार यांनी फोनद्वारे उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात. उद्घाटनप्रसंगी माजी सैनिक भिला माळी, प्रगतशील शेतकरी अजित पाटील, संतोष घोळके, किशोर माळी, संदिप राजपुत, बापू भिल आदी ग्रामस्थ व युवक उपस्थीत होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी यांनी केले. अक्षय पाटील यांनी आभार मानले.

खर्ची खु. येथील ध्येय अभ्यासिकेसाठी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, माजी सैनिक भिला माळी, श्री. किशोरजी, जगण बापू, प्रगतशील शेतकरी अजीत पाटील, पेट्रोलपंप संचालक समाधान पाटील यांनी देणग्या दिल्या असून १४,२०० रूपये यातून जमा झाले आहेत. अभ्यासिकेसाठी या उपयोग केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here