तिस सेकंदात झाली कमाल दहा वर्षांच्या मुलाने उडवले दहा लाख

इंदौर : मध्य प्रदेश राज्याच्या निमच जिल्हयात एका घटनेने खळबळ माजली आहे. अवघ्या दहा वर्षाच्या मुलाने बॅंक कर्मचा-यांच्या नजरेत धुळ फेकत तिजोरीतून दहा लाख रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार अवघ्या तिस सेकंदात घडला. या अद्भूत चोरीमुळे बँक प्रशासनासह पोलिस देखील काही क्षण चक्रावले होते.

बॅंकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगा त्या को ऑपरेटीव्ह बँकेत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आला होता. त्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये चोरपावलांनी प्रवेश केला. कॅशिअरसमोर त्यावेळी इतर ग्राहक देखील उभे होते. मात्र काही कळण्याच्या आत त्या अनोळखी मुलाने अवघ्या 30 सेकंदांत 10 लाख रुपये लांबवले.

तो बाहेर पडू लागताच बॅंकेचा अलार्म वाजला आणि त्याच्या पाठोपाठ सुरक्षा रक्षक धावला. मात्र तो हाती लागला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याच्या अगोदर एक विस वर्षाचा तरुण तेथे हजर होता. त्या तरुणाने संशयास्पद अवस्थेत अर्धा तास रेकी केल्याचे दिसून आले. कॅशीयर जागेवरुन उठताच त्या तरुणाच्या इशा-याने हा चोरीचा प्रकार झाल्याचे दिसून आले.

अल्पवयीन मुलगा उंचीने लहान असल्यामुळे कॅशिअरच्या काऊंटरसमोरील ग्राहकांना देखील तो दिसला नाही. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here