वडीलांच्या खूनप्रकरणी मुलीला पोलिस कोठडी

On: July 15, 2020 7:56 PM

नाशिक : माहेरी आलेल्या मुलीची वडीलांनी छेड काढल्यामुळे संतापलेल्या मुलीने पित्याच्या गळ्यावर पाय देवून त्याला ठार करण्याची घटना काल नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या घटनेनंतर पिडीत विवाहिता आपल्या पतीसह नाशीक रोड पोलिस स्टेशनला दाखल झाली होती. रात्री उशिरा नाशिकरोड पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

सुभाष चिंतामण बोराडे असे खून झालेल्या बापाचे नाव आहे. आपल्या पित्याची हत्या करणा-या विवाहितेने आकाश शिंदे नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला आहे. गेल्या चार महिन्यापुर्वी हे जोडपे नाशिकला मयताच्या घरी राहण्यास आले. या विवाहीतेने काही महिन्यांपुर्वी एका बाळाला जन्म दिला आहे.

काल सायंकाळी सदर विवाहिता घरी एकटीच असतांना मयत सुभाष बोराडेने आपल्याच मुलीची छेड काढली होती. त्यामुळे संतापलेल्या मुलीने बापाच्या गळ्यावर पाय देवून त्याला ठार केले. अटकेतील विवाहितेला आज न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment