जळगाव : काही दिवसांपुर्वी जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बिलखेडा शिवारातील उत्तम महादू पाटील यांच्या शेतात तिन हजार केळी पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यातील निम्म्याहून अधीक पिकाचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आणि पंचनामे शासनाने करावेत अशी मागणी शेतकरी उत्तम पाटील यांनी केली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने गैरहजेरी लावली होती. पाऊसच नसल्यामुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. या उकाड्याने नागरिक प्रचंड प्रमाणात हैरान झाले होते. कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावली मात्र अनेक शेतक-यांच्या पिकांचे नुकसान देखील झाले आहे.