हवाल्याच्या संशयातून 43 लाख रुपयांची रोकड जप्त

अकोला : मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेस 18 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर थांबताच मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील दोघा संशयीत प्रवाशांना आरपीएफ जवानांनी त्यांच्याकडील रोकडसह ताब्यात घेतले.

दोघा प्रवाशांची झडती घेण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून 43 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सदर रक्कम हवाल्याची असल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलिस तपास सुरु आहे.

मनोज हरीराम शर्मा असे रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचे नाव आहे. त्याच्याजवळ या रोकडबाबत कोणतेही कागदपत्रे नव्हती. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here