लॉकअपमधील आत्महत्येप्रकरणी पोलिस निलंबीत

अमरावती : अपहरण व बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीस अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधे ठेवण्यात आले होते. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला अटक केली होती.

लॉकअप मधील 24 वर्षाच्या आरोपीने काल 19 ऑगस्ट रोजी स्वत:च्या शर्टाने लॉकअपच्या गेटला गळफास घेत आपली जिवनयात्रा संपुष्टात आणली. सागर श्रीपतराव ठाकरे असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्धा अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 20 ऑगस्ट पर्यंत त्याची पोलिस कोठडी होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह इतर वरिष्ठ अधिका-यांनी राजापेठ पोलिस स्टेशन गाठत घटनेची माहिती घेतली. डेथ इन कस्टडीचा प्रकार असल्यामुळे न्यायधिश आल्यानंतरच याघटनेचा पंचनामा पुर्ण करण्यात आला. या प्रकरणी लॉकअप ड्युटीवरील गार्ड निलंबीत करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here