जळगाव : विषारी द्रव्य प्राशन केल्याने तालुक्यातील कुसुंबा येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. दिपक एकनाथ खैरनार असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
दिपक खैरनार याने कोणतेतरी विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी त्यास मयत घोषीत केले. डॉ. निता पवार यांनी दिलेल्या खबरींनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सदर अकस्मात मृत्यूची नोंद 96/21 सीआरपीसी 174 नुसार घेण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र गायकवाड करत आहेत.