हिंगोली : हिंगोली शहरानजीक असलेल्या गारमाळ येथील एका जीपचालकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाडेतत्त्वावर जीप नेऊन हा खून करण्यात आला आहे. युसुफ नौरंगाबादी असे खून झालेल्या जिपचालकाचे नाव आहे. या खूनप्रकरणी हिंगोली शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी पहाटे तिघा जणांना चौकशीकामी ताब्यात घेत चौकशी केली जात आहे.
गारमाळ येथील रहिवासी असलेल्या युसूफ नौरंगाबादी यांच्या मालकीची स्कॉर्पिओ ते भाडेतत्वावर प्रवासी वाहतुकीसाठी चालवतात. 11 ऑगस्ट रोजी तिघा जणांनी त्याची जीप भाडेतत्त्वावर नेली होती. त्यानंतर ते घरी आलेच नाही. त्यांचा मोबाईल देखील बंद येत होता. त्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी याबाबत हिंगोली शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. दरम्यान किल्लारी पोलिस स्टेशन अंतर्गत एका शेतशिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला.