मुंबई : एका प्रसिद्ध अभिनेत्रीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणल्याचे समजताच सतर्कतेने सांताक्रुझ पोलिसांनी धाव घेत दलालांचा डाव हाणून पाडत अभिनेत्रीची सुटका केली आहे. मुंबईच्या पंचतारांकीत हॉटेलमधे या प्रसिद्ध अभिनेत्रीची एका रात्रीसाठी चार लाख रुपयात विक्री केली जाणार होती.
बॉलीवूडची दुनिया जेवढी झगमग आणि रंगीबेरंगी दिसते तेवढीच या दुनियेची दुसरी बाजू मात्र काळीकुट्ट असल्याचे कित्येक घटनांमधून उघड झाले आहे. या मायानगरीत नव्याने येणा-या, आलेल्या व स्थिरावण्याच्या स्थितीत असणा-या कित्येक अभिनेत्रींना या काळोख्या रस्त्याने जाण्याची वेळ येते. या दुनियेत अमाप पैसा असला तरी तो क्षणभंगूर देखील ठरतो. त्यामुळे कमाईची जशी आणि जेव्हा संधी मिळेल तशी त्या परिस्थितीत कमाई करुन घेण्याची देखील अनेक नट्या तयारी ठेवत असल्याचे देखील दिसून येते.
राज कुंद्रा प्रकरणानंतर विविध धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. सांताक्रुझ पोलिसांच्या गुन्हे शाखा – 7 ने वेळीच छापा घातल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीची सुटका आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या अभिनेत्रीचा चार लाख रुपयात सौदा करणा-या दलाल महिलेस अटक करण्यात आली आहे.