जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा मोटार सायकल चोरट्यांना अटक केली आहे. शुभम राजेंद्र परदेशी, दिपक सुनिल खरे, शुभम शांताराम माळी (तिघे रा. शहापुरा ता.पाचोरा जिल्हा जळगाव) अशी अटकेतील तिघा मोटार सायकल चोरट्यांची नावे आहेत.
अटकेतील तिघा चोरट्यांनी पाचोरा शहर, जळगाव शहर, सोयगाव ता.जि. औरंगाबाद येथून मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या ताब्यातून एकुण सात मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पाचोरा, रामानंद नगर आणि सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथील मोटार सायकल चोरीचे गुन्हे तिघांकडून उघडकीस आले आहेत.
तिघे चोरटे जळगाव आणि सोयगाव येथे फोटो शुट करण्यासाठी गेले होते. फोटो शुट करत असतांना त्यांना काही मोटार सायकली आवडल्या. आवडलेल्या मोटार सायकली त्यांनी चोरल्याचे कबुल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, प्रदिप पाटील, नरेंद्र वारुळे, दादाभाऊ पाटील, जयवंत चौधरी, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, राहुल बैसाणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी यांनी या तपासकामी सहभाग घेतला.