येरवडा कारागृहातून मोक्यातील पाच आरोपींचे पलायन

On: July 16, 2020 11:17 AM

पुणे : येरवडा तात्पुरत्या कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्हयात सहभागी असलेले पाच आरोपी पहाटे खिडकीचे गज तोडून पळून गेल्याची घटना घडली. येरवडा तात्पुरत्या कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही सलग चौथी घटना असल्याचे म्हटले जात आहे.

कोरोना विषाणूच्या  पार्श्वभूमीवर न्यायाधीन बंदी तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहेत. वारंवार बंदी पळून जाण्याच्या घटनेमुळे कारागृह सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पलायन केलेल्या आरोपींमध्ये देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघे रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे),  अक्षय कोडक्या  चव्हाण,  ( लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे),  अजिंक्य उत्तम कांबळे (सहकार नगर टिळेकर वाडी) यांचा समावेश आहे.देवगन,  गणेश,  अक्षय हे तिघे दौंड पोलिसांनी मोक्याच्या पुण्यात अटक केलेले आरोपी असून या घटनेने खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment