विलगीकरण कक्षातील पलंग, गाद्यांची चोरी करणा-यांना अटक

ळगाव : महावितरण परिमंडळ कार्यालयाच्या परिसरात असलेल्या ऑफिसर्स क्वॉटर्समध्ये कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. या विलगीकरण कक्षातून गाद्या, पलंग, पंखे, उशी व ट्युब लाईट अशा साहित्याची चोरी झाली होती. सदर चोरी 3 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. सदर साहित्य चोरणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ऑफीसर्स क्वॉटर्समधे कोविड रुग्णांसाठी या विलगीकरण कक्षाची निर्मीती करण्यात आली होती. यामधे चार प्रशिक्षणार्थी महिला रहात होत्या. प्रशिक्षण आटोपल्यानंतर या महिला कक्ष सोडून गेल्या होत्या. त्यानंतर 27 जुलै पासून हा कक्ष बंद अवस्थेत होता. कक्ष बंद असल्याचे लक्षात घेत चोरट्यांनी कक्षाचे कुलूप तोडून त्यात असलेल्या गाद्या, पंलग, सहा पंखे व दोन ट्युटलाईट असा एकुण 65 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर चोरी उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पो.नि. शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, योगेश बारी, पोलीस चालक इम्तियाज खान यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here