जळगाव : एचयुआईडी, स्टॉक डिक्लेरेशन व हॉलमार्कच्या काळ्या कायद्याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतातील ज्वेलर्स आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे देखील जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व सराफ व्यावसायिक बांधवांना 23 आगस्ट 2021 रोजी आपली सुवर्ण प्रतिष्ठाने बंद ठेवण्याची हाक दिली आहे. या दिवशी देशातील सर्व सराफ व्यवसाय बंद राहणार आहे. या बंदमधे जळगाव जिल्ह्यातील सराफ असोसिएशन देखील सामील आहे. जिल्ह्यातील सराफ बांधवांनी या बंदचा एक हिस्सा होण्याचे व आंदोलनाला पाठींबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.