अभिनेत्री रिया चक्रवर्तीला खूनाची धमकी

On: July 16, 2020 2:49 PM

सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर त्याची कथीत गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धमकीचा संदेश आला आहे. या धमकीचा स्क्रीनशॉट तिने सर्वत्र शेअर केला आहे. याशिवाय तिने सायबर सेलकडे तक्रार देखील केली आहे.

सुशांतच्या आठवणीत तिने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे तिला धमक्या मिळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराला कंटाळून तिने सायबर सेलकडे तक्रार दाखल करत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. ‘जर तु आत्महत्या नाही केलीस तर तुझा रेप आणि खून केला जाईल असे या धमकीत म्हटले आहे. या धमकीत पुढे म्हटले आहे की मी त्याकरता लवकरच माणसं पाठवेन’.

रियाने आपली पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, ‘मला पैशांसाठी लालची म्हटले, मला शिव्या दिल्या, मला खुनी म्हटले तरी देखील मी शांत होते. मात्र माझी शांतता तुम्हाला हे सांगण्याचा अधीकार कसा काय देते की तुम्ही माझा बलात्कार व खून कराल? रियाने या पोस्टमध्ये सायबर सेलला टॅग केले आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर धमकीचा संदेश आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment