म्हसावद शाळेत रक्षाबंधन उत्साहात

On: August 22, 2021 10:14 AM

जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध.थेपडे उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षक वाय.पी.चिंचोरे यांनी रक्षाबंधन या बहीण-भावाच्या पवित्र सणाचे महत्व विद्यार्थ्यांना विषद केले. प्राचार्य सोनार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे या प्रसंगी कौतुक केले.

विद्यालयाचे पर्यवेक्षक शिक्षक भंगाळे यांनी बहिण भावाचे अतुट नात्याचे   महत्व सांगून हे नाते अधिक घट्ट कसे राहिल या विषयी मार्गदर्शन केले. शिक्षक एस.जे.पवार यांनी हा कार्यक्रम पवित्र भारतीय संस्कार व संस्कृतीचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना फराळासह रक्षाबंधनाची भेट म्हणून पेन विररीत करण्यात आले. आभार प्रदर्शन शिक्षक निलेश पवार यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment