पीएसआय अनिल मुळे आत्महत्येचा तपास सीआयडीकडे

अमरावती : अमरावती शहर पोलिस दलात पदोन्नतीच्या मार्गावर असलेल्या पोलिस उप निरीक्षक अनिल मुळे यांनी गेल्या 13 ऑगस्ट रोजी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपुष्टात आणली होती. या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांकडून विविध आरोपात्मक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. याशिवाय या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी देखील करण्यात आली होती.

या आत्महत्येचा सखोल तपास करण्याचे आदेश स्थानिक सीआयडीला देण्यात आला आहे. अनिल मुळे हे कधी कधी व किती वाजता पोलिस आयुक्तालयात वरिष्ठांच्या भेटीला आले होते. त्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज यासह विविध पुरावे संकलीत करण्याचे काम सीआयडीने सुरु केले आहे.

आत्महत्या करणारे पोलिस उप निरीक्षक अनिल मुळे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिपदेखील सोशल मिडीयावर प्रसारीत झाली होती. सीआयडीच्या पोलिस उप अधिक्षक दीप्ती ब्राम्हणे यांच्याकडे तपासाची सुत्रे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here