गोंदेगाव ता. सोयगाव : औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील कथित ग्रामसेवकाच्या गैरकारभाराची तक्रार स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पुराव्यानिशी एसीबी औरंगाबाद कार्यालयाकडे केली असल्याचे म्हटले जात आहे.
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील संबंधीत ग्रामसेवकाच्या गैरकारभाराच्या अनेक तक्रारी असून या तक्रारींची चौकशी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या माध्यमातून सुरु असल्याचे देखील समजते.
आता या गैरकारभाराची तक्रार एसीबीकडे देखील गेली असल्याने भविष्यात या ग्रामसेवकावर काय कारवाई होते याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे. याबाबत जलदगतीने चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची रास्त मागणी आहे.