सोलापूर – सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे. जळगावला पोलिस अधिक्षकपदी असतांना दत्तात्रय कराळे यांची ठाणे येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त पदावर नेमणूक झाली होती. आता ते सोलापूर शहरचे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेणार आहेत. अंकुश शिंदे यांच्या बंदलीनंतर रिक्त जागी दत्तात्रय कराळे यांच्याकडे सोलापुरची जबाबदारी आली आहे.
अंकुश शिंदे यांची मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक (सुधार सेवा) या जागी पदोन्नतीवर बदली झाली आहे. गेल्या 26 महिन्यांपासून ते सोलापुर येथे कार्यरत होते. दत्तात्रय कराळे यांची उस्मानाबाद, जळगाव, पुणे, ठाणे येथील कामगिरी आणि लोकप्रियता अद्यापही कायम आहे. एरडोली (ता. मिरज, जि. सांगली), सैनिक स्कूल (सातारा) येथून दत्तात्रय कराळे यांनी आपले शालेय शिक्षण पुर्ण केले आहे. विक्रीकर अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या शासकीय सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.