जबरीने पैशांची वसुली करणारा पीएसआय निलंबीत

पुणे – तीन वेगवेगळ्या हॉटेलमधून जबरीने पैशांच्या मागणीसह वसुली करणा-या पोलिस उप निरीक्षकास मुंढवा पोलिसांच्या पथकाने उशीरा रात्री अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी सदर पीएसआयला तातडीने निलंबीत केले असून पुढील तपास सुरु आहे. मिलन कुरकुटे असे निलंबीत करण्यात आलेल्या पीएसआयचे नाव आहे.  

हिंजवडी पोलिस स्टेशनला नेमणूकीस असलेला पोलिस उप निरीक्षक मिलन कुरकुटे हा गेल्या 21 ऑगस्टपासून मेडीकल रजेवर होता. मंगळवारच्या रात्री वर्दी परीधान करुन चारचाकी वाहनाने मुंढवा येथील हॉटेल लोकल गॅस्ट्रो अ‍ॅण्ड बार येथे तो प्रकट झाला. तातडीने हॉटेल बंद करा अन्यथा तुमच्या हॉटेलवर कारवाई केली जाईल असे जोरजोरात ओरडून सांगण्याचे काम मिलन मुरकुटे याच्याकडून वर्दीवर सुरु झाले. आमच्या हॉटेलमधे यावेळी एकही ग्राहक नसल्याचे मॅनेजरने सांगितले असता मी पोलिस कमिशननर ऑफीसमधून आलो असल्याचे त्याने म्हटले. कारवाई टाळायची असल्यास दोन हजार द्यावे लागतील असे त्याच्याकडून सांगण्यात आले. तेथून जबरीने दोन हजार रुपये घेतल्यानंतर त्याने हॉटेल वन लॉन्ज गाठली.

हॉटेल वन लॉन्ज येथून देखील दोन हजाराची रक्कम जबरीने घेतली. त्यानंतर एबीसी मार्गावरील हॉटेल कॉनीव्हल हे बंद असलेले हॉटेल जबरीने उघडून तेथून तिन हजार रुपये घेतले. या प्रकारानंतर हॉटेल मेट्रो व हॉटेल धमाका येथून अशाच पद्धतीने वसुली केल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची माहिती मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांना पहाटे समजली. याप्रकरणी मारुती गोरे यांच्या फिर्यादीनुसार पीएसआय मिलन कुरकुटे याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी या घटनेची गांभिर्याने दखल घेत कुरकुटे यास निलंबीत केले असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here