विवाहीतेची खंडाळ्यात आत्महत्या

जळगाव – भुसावळ तालुक्यात असलेल्या खंडाळा या गावी राहणा-या विवाहीतेने घरातील पंख्याला साडीच्या मदतीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने खंडाळा या गावी खळबळ माजली आहे. अश्विनी किशोर चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे.

दरम्यान या विवाहीतेच्या दोघा मुलांना सतत उलट्या होत असल्यामुळे त्यांना नजीकच्या गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुक्रमे 3 आणि 9 वर्ष वय असलेल्या मुलांना उलट्या होण्याची आणि त्यांच्या आईने गळफास घेत आत्महत्या करण्याच्या दोन्ही घटना सध्या तरी अनाकलनीय आहे. या दोन्ही घटनांचा उलगडा होणे गरजेचे आहे. मुलांना विषबाधा झाली किंवा काय याचा वैद्यकीय तपासणीनंतर उलगडा होईल. तसेच विवाहीतेने आत्महत्या का केली याबाबत अनेक तर्क वितर्क केले जात आहेत.

घटनास्थळी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिल्यानंतर त्याठिकाणी विषारी द्रव्य असलेल्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. मयत अश्विनीचा मृतदेह जळगाव येथे शव विच्छेदनकामी रवाना करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here