सारस्वत बॅकेवर दरोडा ; नवी मुंबईतील घटना

On: July 16, 2020 8:20 PM

नवी मुंबई : नवी मुंबईच्या कोपर खैराने येथील सारस्वत बॅंकेवर दरोडा पडल्याची घटना आज भर दुपारी घडली. चाकूच्या धाकावर दोघांनी बॅंकेच्या लॉकर मधील जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड ताब्यत घेत पोबारा केला.

सारस्वत बॅकेच्या शाखेत भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने खळबळ माजली आहे. घटनेच्या वेळी बॅंकेत केवळ सहा ते सात कर्मचारी हजर होते. दरोडेखोरांपैकी एकाने चाकूच्या धाकावर एका कर्मचा-यास लॉकर उघडण्यास भाग पाडले. त्या लॉकर मधील सुमारे साडेचार लाख रुपयांची रोकड घेत पळून जाण्यात दोघे यशस्वी झाले.

जवळपास पस्तीशीच्या वयोगटातील दोघांनी चेह-याला मास्क लावले होते. हाताचे ठसे उमटू नये यासाठी दरोडेखोरांनी ती घेतलेली खबरदारी असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी कोपर खैराने पोलिस स्टेशनला गुहा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment