जळगावात महिलेची निघृण हत्या

On: August 27, 2021 11:34 AM
crimeduniya

जळगाव – एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या तुळजाई नगर रामेश्वर कॉलनी भागात आज भल्या पहाटे एका महिलेचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

वंदना गोरख पाटील असे हत्या झालेल्या महिलेचे नाव समोर आले असून तीचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती पुढे आली आहे. सदर महिलेचा अतिशय निघृण खून केल्याचे दृश्य बघून अनेकांना भोवळ आली. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनला समजताच अधिकारी व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटना घडली त्या घरात महिलेचा चेहरा छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला.

मयत महिलेच्या डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे देखील दृष्टीस पडल्याने एवढा निघृण खून कुणी व कशासाठी केला असावा याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment