पगाराअभावी हतबल एसटी चालकाची आत्महत्या

On: August 27, 2021 6:47 PM

धुळे – पगार अनियमीत होत असल्यामुळे हतबल एसटी चालकाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपुष्टात आणली आहे. कमलेश बेडसे असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. मयत कमलेश बेडसे हा कर्मचारी धुळे जिल्ह्याच्या साक्री डेपोत कार्यरत होता.

घरात कुणी नसतांना गळफास घेत आत्महत्येचा हा प्रकार घडला आहे. आपल्या सहका-याने केलेल्या आत्महत्येमुळे संतप्त सहकारी कर्मचा-यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे नागपूर-सुरत महामार्गावर वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा बेडसे यांच्या नातेवाईक व कर्मचारी संघटनेकडून घेण्यात आला होता. अगोदरच कमी वेतन व ते देखील अनियमीत मिळत असल्यामुळे लोकांची देणी कशी द्यायची अशी विवंचना बेडसे यांच्यासारख्या कित्येक कर्मचा-यांना असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आंदोलनाच्या वेळी उमटत होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment