चोरीच्या दोन मोटारसायकलीसह चोरटा अटक

On: August 28, 2021 8:05 PM

जळगाव – जळगाव बस स्थानक परिसरातून जिल्हा पेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटार सायकल चोरट्यास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. किरण भगवान चौधरी (33) रा. म्हैसवाडी पोस्ट बामणीद ता. यावल असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.

जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोहेकॉ फिरोज तडवी, पोलिस नाईक अशोक सनगत, पो. कॉ. योगेश सावळे, पो.कॉ. विकास पहुरकर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील मोटार सायकल चोरट्यास उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment