पुणे – पुणे शहराच्या दत्तवाडी परिसरात मतिमंद तरुणीवर अत्याचार करणा-या चौघा नराधमांना अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी दत्तवाडी पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्वेश जाधव (36), श्रीकांत सरोदे (36), आदित्य पवार (19) आणि आशिष मोहिते (18) अशी अटकेतील चौघा नराधम तरुणांची नावे आहेत.
पिडीत तरुणी शुक्रवारच्या सायंकाळी भारती विद्यापीठ परिसरात तिच्या राहत्या घराच्या दिशेने जात असतांना आदित्य पवार याने तिला जनता वसाहतीत नेले. तेथे त्याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले. बंद खोलीत तिच्यावर अत्याचार होत असतांना परिसरातील नागरिकांना संशय आला.
या घटनेप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात तरुणीची सुटका केली. या घटनेप्रकरणी दत्तवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील श्रीकांत सरोदे हा एका खूनातील आरोपी आहे.






