कमी रकमेत हज यात्रेचे आमिष दाखवत फसवणूक

On: August 29, 2021 10:20 AM

सोलापूर – कमी पैशात सौदी अरब येथे हज-उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवत जेष्ठ नागरिकाची साठ हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमद सादीक महिबूबसाब बेपारी (75) , रा. रविवार पेठ यांनी जेल रोड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीनुसार  सुजातअली अ. करीम शेख, फिरदोस सुजातअली शेख, शहावेज सुजातअली शेख (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीत आरोप करण्यात आलेल्या तिघांनी मिळून 1 जून ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत कमी पैशात हज-उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवले होते. तिघांनी त्यांच्याकडून साठ हजार रुपये घेतले होते. मात्र यात्रेला नेले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेपारी यांनी गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment