अकोला येथे हायप्रोफाइल देहव्यापार अड्ड्यावर छापा

On: August 29, 2021 11:17 AM

अकोला – अकोला येथील गोरक्षण रस्त्यावर असलेल्या आदर्श कॉलनी भागात सुरु असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री खदान पोलिसांच्या पथकाने छापा घातला. या कारवाईत दोघा पिडीतांची सुटका करण्यात आली असून महिला व दलाल अशा एकुण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

पो.नि.श्रीरंग सणस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी देह व्यापार सुरु असलेल्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर टाकलेल्या धाडीत सापळा रचून महिला, दलाल अशा चौघांना अटक केली. याप्रकरणी अमरनाथ सिताराम यादव (68) आदर्श कॉलनी, सचिन रुपचंद कुटे (19) १९रा. कुटे, मनोज जयंतीलाल परमार (35) रा. धामापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या कारवाईत दोघा पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. दोन मोटार सायकली, चार मोबाईल असा एकुण साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या निर्देशाखाली खदान पोलिस स्टेशनचे पो.नि. श्रीरंग सणस, स.पो.नि. ठाकरे, सदाशिव मार्गे, राजेश वानखडे, धीरज वानखडे, श्रीकृष्ण भारती, इमाम चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment