रिमोटचा हट्ट बेतला चिमुकलीच्या जीवावर

On: July 17, 2020 3:14 PM


नवी दिल्ली : चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा केलेला हट्ट चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.रिमोटची मागणी केली म्हणून सात वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली आहे.या घटनेची पोलीस चौकशी व तपास करत आहेत.

तामिळनाडूच्या सथंकुलममध्ये हा प्रकार घडला. चॅनल बदलायला सांगितले म्हणून संतापाच्या भरात मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनीयाप्रकरणी आरोपीताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सात वर्षांची मुलगी तिस-या इयत्तेमधे शिकत होती. घरात वीज नसल्यामुळे ती शेजारी टीव्ही पाहण्यासाठी गेली. त्याचवेळी शेजारची व्यक्ती चिमुकलीच्या वडीलांसोबत वाद घालत होती.शेजाऱ्याने लावलेलं टीव्ही वरील चॅनल मुलीला बघायचे नव्हते. त्यामुळे चॅनलबदलण्यासाठी ती सारखा हट्ट धरू लागली.

चॅनल बदलण्यासाठी रिमोट देण्याची मागणी ती करत होती.त्यावेळी संतापलेल्या शेजाऱ्याने रागाच्या भरात निरागस चिमुकलीचा गळा दाबून तिची हत्या केली. आरोपीने आपला गुन्हा लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवला.

मृतदेहाची विल्हेवाट लावताना काही लोकांनी त्याला पाहिले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment