जळगाव – प्राणघातक हल्लाप्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी समीर हनीफ काकर यास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. समीर काकर हा गुन्हा घडल्यापासून गेल्या एक वर्षापासून फरार होता.
गेल्या वर्षी 12 सप्टेबर 2020 च्या रात्री भोलासिंग बावरी हा तांबापुरा भागातील महिलेच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेला होता. यावेळी सदर महिलेला जाग आली असता तिने आरडाओरड केल्यानंतर भोलासिंग हा तेथून पळून गेला होता. त्यानंतर सकाळी महिलेने हा प्रकार तिच्या पतीसह इतरांना सांगीतल्यानंतर झालेल्या दगडफेकीत काही जण जखमी झाले होते.
या घटनेत एकुण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सहा जणांना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाची अटकपुर्व जामीनावर सुटका झालेली आहे. यापैकी समीर हनीफ काकर हा गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून फरार होता. समीर काकर हा जळगाव शहरात आला असल्याची गुप्त माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सचिन पाटील यांनी त्याला अजिंठा चौफुली येथून ताब्यात घेत अटक केली. त्याच्यावर घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत.
अटकेतील समीर काकर यास न्या. ए.एस.शेख यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारतर्फे अॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.