शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी आंदोलनाच्या तयारीत

जळगाव – जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील खोटेनगर भागातील शिवशक्ती कॉलनीमध्ये सार्वजनिक गटार बांधकामामध्ये मोठ्या गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी संगनमत करून माजी सैनिकाच्या घरासमोरील गटारीचे काम न करता बिले काढल्याचीही चर्चा जोर धरु लागली आहे.

जळगाव मनपा हद्दीमधील मौजे निमेखेडी शिवारातील खोटेनगर भागातील शिवशक्ती कॉलनी मधील गट नं.101, प्लॉट नं.38 येथील रहिवाशी असलेले माजी सैनिक योगराज रामदास पाटील यांच्या घरासमोरील हा प्रकार असल्याचे कळते. योगराज पाटील हे गेल्या अकरा वर्षापासून याठिकाणी राहतात.

त्यांच्या घरासमोरील उत्तरेकडील गल्लीमध्ये सार्वजनिक गटारीचे बांधकाम सुरू होते मात्र काही कारणास्तव ते बंद पडले यानंतर चौकशी केली असता ते पुर्ण झाल्याचे रहिवाश्यांना समजले. दरम्यान योगराज पाटील यांच्यासह काही रहिवाश्यांच्या घरासमोरील गटारीचे बांधकाम अपुर्ण असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली असता ते ठेकेदारांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान मनपाचे संबंधित शाखा अभियंता यांना नागरिकांनी जाब विचारला असता, आमच्याकडे तक्रारी नसल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असे त्यांना मौखिक उत्तर मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. मनपा प्रशासनाने संबंधीत गटारीच्या बांधकामाविषयी सर्वव्यापी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी या मागणीसाठी शिवशक्ती कॉलनीमधील रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here