मदरशामधील शिक्षकावर अत्याचाराचा गुन्हा

On: July 17, 2020 4:17 PM

गुजरातच्या कच्छ जिल्हयातील मदरसा शिक्षक मौलाना समसुद्दीन हाजी सुलेमान जाट यास पोलिसांनी विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. या मदरशा शिक्षकाने चार वर्षांपासून एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

१९ वर्षीय पीडित मुलीचे नुकतेच लग्न झाले होते. मौलाना विरोधात पीडितेच्या पतीने तिला बलात्काराची तक्रार दाखल करण्यास प्रोत्साहित केले.पीडितेची शारीरिक तपासणी केल्यानंतर लैंगिक छळाचे पुरावे सापडले आहेत.

पोलिसांनी आरोपी मदरसा शिक्षक समसुद्दीन हाजी सुलेमान जाट यास अटक केली. गुजरातच्या कच्छ जिल्हयातील नखतरणा तालुक्यातील नारा पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment