नाशिकरोड – जुनी मशीनरीसह उत्पादनात झालेली घट तसेच नव्याने आलेले महाव्यवस्थापक बोलेवर बाबू यांची कामगारांप्रती असलेली कार्यपद्धतीमुळे वाढलेला ताण या सर्व घटकांच्या आधारे नाशिकरोड येथे असलेल्या इंडीया सिक्युरिटी प्रेस अॅंड नोट प्रेस कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरु झाले आहे.
मजदूर संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की प्रेस स्टाफ युनियन कार्यरत असून संघटनांसोबत चर्चा करुनच व्यवस्थापन निर्णयांची अंमलबजावणी करत असते. प्रेसमधील मशिनरी जुनी झाली आहे. कामगार संख्या कमी होत एक हजारावर आली आहे. तरी देखिल संघटनेच्या मार्फत कामगारांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे उत्पादनावर परिणाम होऊ देण्यात आलेला नाही.
असे असले तरी नव्याने आलेले मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू हजर होताच चित्र बदलले आहे. कामगार संघटनेसोबत विचारविनीमय करुनच निर्णया घ्यावे अशी त्यांना संघटनेच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र जुनी मशीनरीसह खराब कच्चा माल यातील उणीवा दुर न करता केवळ उत्पादनावर लक्ष देण्यात येत आहे. जास्त वेळ काम करुन देखील त्याचा योग्य तो मोबदला दिला जात नाही. त्यामुळे कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. मजदूर संघ, स्टाफ युनियन, एससीएसटी मायनॉरिटीज असोसिएशन या संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.