औरंगाबाद – सात हजार रुपयांची उधारी देण्यासाठी जुने वाहन खरेदी-विक्री करणा-या कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून थेट कार पळवून नेल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी आझाद चौक रस्त्यावर घडली होती. हा प्रकार कळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे नाशिक व अहमदनगर पोलिसांपर्यंत अलर्ट रवाना केला. एलसी बीने तब्बल साठ किमी अंतरपर्यंत पाठलाग कर वैजापूर नजीक चोरट्यांना ताब्यात घेतले.
फैसल रफिक सय्यद (24), रा. रहेमानिया कॉलनी) व सय्यद अरबाज सय्यद आरेफ (24), रा. रोशन गेट अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहे. चोरलेली कार मुंबईला विक्री करण्याचे आरोपींचे नियोजन होते.
अटकेतील दोन्ही आरोपी मोबाइलच्या दुकानात कामाला आहेत. कर्मचारी रोहनच्या गळ्याला चाकू लावल्यानंतर ‘तुझ्या मालकाचा खून करण्याची दीड लाखात सुपारी मिळाली असून तु हे तू मालकाला सांग,’ असे दोघे चोरटे म्हणत होते. त्यापूर्वी त्यांनी कार खरेदी विक्री करणारे मालक पाटील यांना मामाच्या मुलाचे व्हिजिटिंग कार्ड दिले होते. त्यामुळे दोघा चोरट्यांची ओळख पटवण्यात अडचण आली नाही.