जळगावातील दरोड्याचा गुन्हा उघडकीस

जळगाव : जळगाव शहरातील दौलत नगर मोहाडी रोड भागात गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दरोडा पडला होता. पिंटू बंडू इटकरे यांच्या घराचा दरवाजा तोडून पाच दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात रोख रक्कम व दागिने मिळून 18,05,000 रुपये किमतीचा ऐवज लुटून नेण्यात आला होता. या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास स्थानीक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने लावला आहे.

या दरोड्याच्या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासाअंती मिळालेल्या पुराव्याच्या आधारे करणसिंग रा.परभणी जि.परभणी, तेजासिंग नरसिंग बावरी, ज्वालासिंग रामसिंग कलाणी (दोघे रा.गुरुगोविंदसिंग नगर, जालना जि.जालना), रणजितसिंग जिवनसिंग जुनी रा. राजीव गांधी नगर,जळगाव, किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक रा.गुरुगोविंदसिंग नगर, जालना जि.जालना अशी नावे पुढे आली.

या गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर असतांना जालना येथे गेलेल्या तपास पथकाने किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक रा.गुरुगोविंदसिंग नगर,जालना यास शिताफीने ताब्यात घेत जळगावला आणले गेले. चौकशीअंती त्याने सदर दरोड्याचा गुन्हा कबुल करत आपल्या साथीदारांची नावे कथन केली. ते साथीदार तपासात नंतर निष्पन्न झाले.
तपास पथकाने रणजितसिंग जिवनसिंग जुनी (22) रा.राजीवगांधी नगर,जळगाव यास ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबुल केला. अगोदर ताब्यात घेतलेल्या रणजितसिंग जिवनसिंग जुनी यांचे कडून एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्या मोबाईलच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्याकामी मदत झाली.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्यासह सहायक फौजदार रवि पंढरीनाथ नरवाडे, पोहेकॉ संदिप रमेश पाटील, पो.ना. संतोष रामास्वामी मायकल, पो.ना. रणजित अशोक जाधव, पो.ना. श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पो.ना. परेश प्रकाश महाजन, चा.पो.कॉ. मुरलीधर सखाराम बारी, पोहेकॉ. संजय नारायण हिवरकर, पोहेकॉ. राजेश बाबाराव मेंढे, पोहेकॉ. सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ. जयंत भानुदास चौधरी, पोहेकॉ. महेश आत्माराम महाजन, पो.ना. किरण यशवंत चौधरी, पो.ना. प्रविण जनार्दन मांडोळे, चापोहेकॉ दिपक ज्ञानदेव चौधरी आदींनी तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील आरोपी कुख्यात दरोडेखोर असून त्यांच्यावर महाराष्ट्रात बऱ्याच जिल्हयांत गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here