घरफोड्या करणारे एलसीबीच्या ताब्यात

On: July 17, 2020 5:30 PM


जळगाव : अट्टल घरफोड्या करणारे तिघांना जळगाव गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.अटकेतील आरोपींनी जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील दोन घरफोड्यांची कबुली दिली आहे.

समीद हमीद काकर (तांबापुरा, जळगाव), मोहनसिंग जगदीश बावरी व दीपक शांताराम रेणुके (तांबापुरा, जळगाव) अशी त्यांची नावे आहेत. आरोपींनी रवींद्र नगर व अन्य एका घरफोडीची कबुली दिली आहे.

त्यांना पुढील तपास कामी रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, राजेश मेढे, संजय हिवरकर, गफ्फार तडवी, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर व किरण चौधरी यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment