जालना : सायंकाळपर्यंत बदली झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा देण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून गायब होणारा हवालदार सापडला आहे. गोविंद कुलकर्णी असे त्या हवालदाराचे नाव आहे.
हवालदार गोविंद कुलकर्णी हे घनसांगवी पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत. पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांची भेट घेऊन गोविंद कुलकर्णी यांनी बदलीसाठी विनंती अर्ज दिला होता. मात्र कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार बदल्यांच्या दोन ते तिन याद्या निघून गेल्या. तरी देखील त्यांची बदली झाली नाही.
त्यामुळे नाराज झालेल्या गोविंद कुलकर्णी यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यात सायंकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता. या व्हिडीओमुळे जालना पोलिस दलात खळबळ माजली होती. मात्र ते सापडले व त्यांना सुखरुप घरी नेऊन सोडण्यात आले.