पोलिस नाईकास पाचशे रुपयांची लाच भोवली

जळगाव : किरकोळ दारु विक्रीचा व्यवसाय पद्धतशीररित्या आडकाठीशिवाय सुरु ठेवण्याकामी पाचशे रुपयांची लाच मद्यविक्रेत्याकडून घेतांना फैजपूर पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. अनिल भगवान महाजन असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिस नाईक याचे नाव आहे.
दरमहा पाचशे रुपयांचा हफ्ता सदर पोलिस नाईक अनिल महाजन याने तक्रारदार तथा किरकोळ दारु विक्रेत्याकडे ठरवला होता. त्याचा पहिला हफ्ता घेतांनाच पोलिस नाईक अनिल महाजन एसीबीच्या जाळ्यात अडकला.

तक्रारदार यांचा किरकोळ दारू विक्रीचा व्यवसाय असुन सदर व्यवसायावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा ५००/-रुपये हप्त्याप्रमाणे पहीला हप्ता म्हणुन ५००/-रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली व सदर लाचेची रक्कम स्वतःआरोपी यांनी फैजपुर पोलीस स्टेशन येथे पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा.
पोलिस उप अधिक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here