संशयास्पदरित्या फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरित्या फिरणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गस्तीवरील पोलिस पथकाने संशयाच्या आधारे ताब्यात घेतले आहे. ऋषिकेश किशोर विजयावारी असे ताब्यातील तरुणाचे नाव असून तो नितीन साहित्या नगर – सुप्रिम कॉलनी जळगाव भागातील रहिवासी आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनचे रात्रकालिन गस्ती पथकातील पो.हे.कॉ. विनोद बोरसे, हेमंत कळसकर, साईनाथ मुंढे, विठ्ठल गर्जे असे सर्व जण मध्यरात्री गस्त घालत होते. दरम्यान सुप्रिम कॉलनी भागातील गितांजली केमीकल्स या कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला सदर तरुण चेहरा लपवून आपली ओळख लपवत वावरत असल्याचे दिसून आले. त्याच्या संशयास्पद हालचाली बघता पोलिस पथक त्याच्या जवळ गेले. पोलिसांना बघून तो पळू लागला. पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

एखादे गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तो बेतात असल्याचा संशय आल्याने पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले. ताब्यातील तरुणाची विचारपुस केली असता त्याने आपले नाव ऋषिकेश किशोर विजयवारी असे सांगितले. या प्रकरणी पो.कॉ. सतिष विठ्ठल गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here