भाजप सचिवाकडून मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपुर्वी औरंगाबाद शहराच्या हनुमान नगर मधे राहणारे भाजपचे सचिव अशोक दामले व त्यांची पत्नी अशा दोघांनी मिळून शेजारी राहणा-या महिलेला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीबाबत सदर महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर देखील दामले यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध केला. त्यामुळे दामले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. नंतर राजकीय दडपण आणून त्या गुन्ह्याच्या कलमात 354 एवजी 509 असा बदल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनसमोर भिडले होते. 

गुरुवारी मात्र या प्रकरणाला वेगळे वळण लागले. 29 वर्षाच्या त्या पिडीत महिलेने विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. तिने तळहातावर “जय शिवराय, मी आत्महत्या करत आहे, त्याला जबाबदार अशोक दामले राहील” असे लिहिले. या घटनेत शिवसेनेने प्रवेश केल्याने त्याला राजकीय वळण लागले.

दरम्यान पिडीत महिलेने विषारी द्रव घेतल्याचे समजताच अशोक दामले यांच्या पत्नीने देखील विषारी औषध घेतले. पिडीता व दामले यांची पत्नी दोघी सुखरुप असल्या तरी या घटनेने खळबळ माजली. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here