क्वारंटाईन सेंटरमधे तरुणीवर अत्याचार

On: July 17, 2020 6:13 PM

पनवेल : पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल एका २५ वर्षीय तरुणीवर क्वारंटाईन असलेल्या एका २५ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. संपूर्ण जग यावेळी कोरोना या विषाणू सोबत लढा देत आहे.

प्रशासन देखील वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयित अथवा हाय रिस्क रुग्णांसाठी क्वारंटाईनची व्यवस्था कोणगाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे.

या इमारतीतच हा खळबळजनक प्रकार उघड आला आहे. हा प्रकार गुरूवारी मध्यरात्री क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल तरुणीबाबत घडला.

या तरुणीचा विकृत तरुणाने विचित्र पद्धतीने विनयभंग केला आहे. पनवेल तालुका पोलिसांनी याप्रकरणी भा.दं.वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पनवेल तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment