पत्नीला मारहाण – पीएसआयविरुद्ध सोलापुरात गुन्हा

सोलापूर : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पीएसआय विरुद्ध त्याच्या सोलापूर येथील माहेरवाशीन पत्नीने गुन्हा दाखल केला आहे. तुझ्या पोटातील बाळ माझे नाही असे म्हणत चारित्र्याचा संशय घेत पोटावर लाथ मारण्याचा प्रकार केल्याचे पीएसआयच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

गर्भवती पत्नीच्या पोटावर लाथ मारल्याने वेदनेने विव्हळणा-या पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्यानंतर तिला माहेरी सोलापुर जिल्ह्यात आणून सोडण्यात आले. या प्रकरणी पीएसआयच्या पत्नीने विजापूर नाका पोलिस स्टेशनला रितसर दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने केलेल्या मारहाणीमुळे रक्तस्त्राव होत गर्भपात झाला असल्याचा आरोप सदर विवाहीतेने केला आहे.

जावई पीएसआय मिळाल्याच्या आनंदात सासरच्या मंडळींकडून सदर विवाहीतेचे लग्न मोठ्या थाटामाटात करुन दिले होते. सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डूवाडीत हे लग्न झाले होते. याशिवाय दिराने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील सदर विवाहीतेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here